LIVE UPDATES

मुळदे ग्रामपंचायतीचा महाराजस्व अभियान उपक्रम स्तुत्य : तहसीलदार सचिन पाटील

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 05:36 PM
views 23  views

कुडाळ : शासकीय योजनांची माहिती व आवश्यक सर्व दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा मुळदे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन तहसीलदार सचिन पाटील यांनी आज शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत महाराजस्व अभियान कार्यक्रमात केले. एकुण ४९ लाभार्थी यांनी लाभ घेतला.

ग्रामपंचायत मुळदे व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तहसीलदार कार्यालय कुडाळ यांच्या सहकार्याने महाराजस्व अभियान या शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाअंतर्गत आज ग्रामपंचायत कार्यालय मुळदे येथे विविध शासकीय योजना व त्यासाठी आवश्यक दाखले याचा लाभ मिळणे करिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडल अधिकारी प्रशांत मसुरकर, सरपंच संध्या मुळदेकर, उपसरपंच प्रवीण पालव ,महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष संजय पालव, ग्राममहसूल अधिकारी आंबडपाल , विद्या अरदकर, पोलीस पाटील रामदास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अपूर्वा पालव ,वैशाली पालव, ग्रामविकास अधिकारी गोविंद तोरसकर, भिवा पालव, सी.आर. पी, मंगल म्हापणकर, शरद पाताडे, गणपत चव्हाण, सिताराम पालव, पांडुरंग पालव, दिनकर धुरी, स्वप्निल मातोंडकर, लीना जाधव, अर्चना सामंत, साक्षी मेस्त्री, अनुजा आसोलकर, कर्मचारी प्रणित पालव, साक्षी पालव, भिकाजी जाधव ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना श्री पाटील म्हणाले, मुळदे ग्रामपंचायत दरवर्षी महाराजस्व अभियान राबविते. एका छताखाली गावातील सर्व आवश्यक शासकीय योजना तसेच आवश्यक असणारे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी राबवित असणारे हे अभियान निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच जणांना तहसीलदार कार्यालयात येणे शक्य नसल्यामुळे गाव पातळीवर असा उपक्रम राबवल्यामुळे सर्वांना हा अतिशय जलद गतीने दाखले उपलब्ध होण्यासाठी स्तुत्य उपक्रम आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत माध्यमातून जे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी निश्चितच सर्व टीमचे कौतुक करावे असेच म्हणावे लागेल. येथील शेतकरी वर्गाने शासनाच्या विविध योजना बरोबरच शेती क्षेत्राशी निगडित जे लाभ आहेत त्याचीसुद्धा माहिती घ्यावी असे सांगितले. मंडळ अधिकारी श्री. मसूरकर यांनी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ हा सर्वसामान्यासह सर्वांनाच मिळाला पाहिजे. त्या योजनेची माहिती व मार्गदर्शन होण्यासाठी ग्रामपंचायतने टाकलेले पावले निश्चितच कौतुकास्पद आहे असे सांगितले .

या शिबिरात जात दाखला, उत्पन्न दाखला, वय अधिवास राष्ट्रीयत्व दाखला शिधापत्रिकेमधे नाव वाढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नवीन शिधापत्रिकासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शिधा पत्रिकेतील नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भूमीहिन शेतमजूर , इ डब्ल्यू एस दाखला, वारस दाखला ,संजय गांधी योजनेकामी आवश्यक कागदपत्रे, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रहिवासी दाखला ३०टक्के महिला मराठा समाज नॉन क्रिमिलियर दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला ,शेतकरी दाखला ,डोंगरी दाखला, प्रकल्पग्रस्त दाखला, अल्पभूधारक दाखला, आदी दाखल्यांचे कामकाज करण्यात आले एकुण ४९लाभार्थी यांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील रामदास चव्हाण यांनी केले. सर्वांचे स्वागत शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. आभार ग्रामपंचायत अधिकारी गोविंद तोरसकर यांनी मानले.


ताजी बातमी

View all

‘पंचायत धरोहर’ उपक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्य नोडल अधिकारी म्हणून शिवराज राठोड यांची नियुक्ती
November 23, 2026
नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
November 23, 2026
ओरोस येथे उद्या गिरणी कामगारांची सभा
November 23, 2026
मासळीच्या पाण्यामुळे देवगडच्या रस्त्यांवर अपघातांचा धोका
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
November 23, 2026
ओरोस येथे उद्या गिरणी कामगारांची सभा
November 23, 2026
मासळीच्या पाण्यामुळे देवगडच्या रस्त्यांवर अपघातांचा धोका
November 23, 2026
Two-day district-level adolescent health training workshop organised by Sindhudurg Zilla Parishad with UNICEF and Maharashtra Public Health Department.
किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय कार्यशाळा
November 23, 2026