LIVE UPDATES

Nitesh Rane Sawantwadi : विद्यार्थ्यांसोबत रमले पालकमंत्री

चिमुकल्यांचा हट्ट पुरवला
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 22, 2026 01:58 PM
views 95  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त सावंतवाडीत आलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांनी कार्यक्रम स्थळाच्या बाजूला पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना भेट देत त्यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला. या भेटीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खुलून गेला.

 पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन आटोपून माघारी फिरत असताना पालकमंत्री नितेश राणे यांना काही शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी बाजूला उभे राहून आपली वाट बघत असल्याचे निदर्शनास आले. शेजारी असणाऱ्या क्लास मधून ते विद्यार्थी आले होते.

पालकमंत्री आल्याचे समजताच त्यांना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली.  यावेळी मंत्री नितेश राणे यांनी चिमुकल्यांना जवळ बोलून त्यांच्याशी संवाद साधला. ती मुलं कोणत्या शाळेत जातात कोणता क्लास करतात तसेच भविष्यात त्यांना काय बनायचं आहे ? असे प्रश्न विचारून त्यांनी मुलांना बोलतं करत त्यांच्याशी मन मुराद गप्पा मारल्या. 

यावेळी त्या मुलांनीही पालकमंत्र्यांसमवेत दिलखुलास संवाद साधला. याप्रसंगी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.