LIVE UPDATES

निलेश राणे पोटतिडकीने प्रश्न मांडतात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुकोद्गार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 15:41 PM
views 34  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : आमदार निलेश राणे हे सभागृहामध्ये पोटतिडकीने प्रश्न मांडत असतात. ते जीव लावून विषय मांडतात हे महत्त्वपूर्ण आहे. सभागृहात बोलताना त्यांचे रक्त पेटून उठलेले असते, असे कौतुकोद्गार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवलीतील कार्यक्रमात केले. निलेश राणेंनी सभागृहात मांडलेले आकारीपड, वनसंज्ञा हे सिंधुदुर्गातील सर्व प्रश्न येत्या काळात सोडविणार असल्याची ग्वाही देखील बावनकुळे यांनी दिली.