LIVE UPDATES

नीट पेपरफुटी विरोधात सावंतवाडीत शांतता मोर्चा

आम्ही भारतीय व विद्यार्थ्यांच्यामार्फत आयोजन : कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 25, 2026 13:30 PM
views 257  views

सावंतवाडी : नीट पेपरफुटी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत शांतता मोर्चा काढण्यात आला. आम्ही भारतीय व विद्यार्थ्यांच्या मार्फत याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आमचे आई-वडील दागिने, जमीन गहाण ठेवून आम्हाला शिक्षण देतात‌, आम्ही मेहनत घेतो अन् पेपर फुटीच फळ आमच्या नशिबी येत अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

सावंतवाडीतील सुजाण नागरिक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पेपरफुटीच्या निषेधार्थ व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपोषणावर केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा निषेधार्ह हा शांतता मोर्चा काढण्यात आला. कळसुलकर हायस्कूल ते गांधीचौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थितांकडून मनोगत व्यक्त करण्यात आली‌. या शांतता पूर्ण मोर्चामध्ये विद्यार्थी, संवेदनशील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कडेकोट पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात ठेवण्यात आला होता.