LIVE UPDATES

​महालक्ष्मी मंदिर, वाडा-परबवाडी रंगणार नवरात्री उत्सव

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 19:04 PM
views 15  views

देवगड : देवगड तालुक्यातील वाडा-परबवाडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात यंदाचा ‘नवरात्री उत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रेलचेलसह साजरा होणार आहे. ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भजनांचे जंगी सामने, महिलांचे कार्यक्रम, शक्ती-तुरा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अशा विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

​उत्सवातील प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे
​रविवार, ११ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.)

श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (वाडा घाडीवाडी) - बुवा अनिल घाडी यांचे सुश्राव्य भजन. ​सोमवार, १२ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.):

श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ (वाडा-गुरववाडी) यांचे सुश्राव्य भजन. ​मंगळवार, १३ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.):

सामने-सामने डबलबारी

भजनांचा जंगी सामना

श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नाडण-देवगड) चे बुवा संदीप पुजारे विरुद्ध श्री हनुमान प्रा. भजन मंडळ (वर्दे-पेडणेकर) चे बुवा गुंडू सावंत.

​बुधवार, १४ ऑक्टोबर (सायंकाळी ६.०० वा.):

ब्राह्मणवाडी महिला मंडळ (वाडा) यांचे सुश्राव्य भजन.

​गुरुवार, १५ ऑक्टोबर - ललिता पंचमी विशेष (रात्री ९.०० वा.):

‘खेडची वाघीण आणि रायगडचा वाघ’ यांचा ललिता पंचमीनिमित्त विशेष ‘शक्ती-तुरा’ कार्यक्रम!

शाहीर कु. वैदेही शेलार (चिंचवली शेलारवाडी, खेड) आणि शाहीर रत्नाकर महाकाळ (मुर्डे गोठलवाडी) यांच्यात शाहिरीचा बहारदार सामना रंगणार आहे.

​शुक्रवार, १६ ऑक्टोबर (सायंकाळी ६.०० वा.):

बुवा अविकांत देवळेकर यांचे सुश्राव्य भजन

​शनिवार, १७ ऑक्टोबर:

​सायंकाळी ५.०० वा : महिलांसाठी विशेष ‘होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा’ (सन्मान नारी शक्तीचा). या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेता विक्रांत खातू करणार आहेत.

​रात्री ८.०० वा.: श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नाडण) - बुवा विजय पुजारे यांचे सुश्राव्य भजन.

​रविवार, १८ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.):

श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नाडण) - बुवा आनंद (आबा) जोशी यांचे सुश्राव्य भजन.

​सोमवार, १९ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.):

डबलबारी भजनांचा जंगी सामना

श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ (पुरळ हुर्शी-देवगड) च्या बुवा साची मुळम विरुद्ध श्री प्रासादिक भजन मंडळ (नाडण-देवगड) च्या बुवा किर्ती पुजारे.

श्री महालक्ष्मी मंदिरातील सर्व धार्मिक, सांस्कृतिक व भक्तीमय कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन व श्री महालक्ष्मी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.