LIVE UPDATES

chiplun news : धर्मपाल पवार यांचे आमदार शेखर निकम यांनी केले कौतुक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 15:57 PM
views 22  views

चिपळूण : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आलेल्या प्रवाशाचे रिक्षामध्ये राहिलेले सुमारे १० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणताही मोह न ठेवता प्रामाणिकपणे संबंधित प्रवाशाला परत करणारे मांडकी गावचे धर्मपाल पवार यांच्या प्रामाणिकपणाचे आमदार शेखरजी निकम यांनी कौतुक केले.

धर्मपाल पवार यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीमुळे मांडकी गावासह चिपळूणची मान उंचावली, असे सांगत आमदार निकम यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम केला. समाजात आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे धर्मपाल पवार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. धर्मपाल पवार यांच्या आदर्शवत कार्याचे आमदार शेखरजी निकम यांनी मनापासून कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.