LIVE UPDATES

दीपक केसरकर यांनी घेतले संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 11:18 AM
views 88  views

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या मडूरे-परबवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले.

यावेळी दीपक केसरकर यांनी गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मडूरे गावचे सरपंच उदय चिंदरकर, आबा केसरकर, वामन नार्वेकर, संतोष नार्वेकर, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परब कुटुंबीय आणि स्नेही उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी गणरायाचे दर्शन घेतले.