LIVE UPDATES

Ganeshotsav 2026 : पालकमंत्री नितेश राणेंकडून वैभववाडीतील गणेशोत्सव मंडळांना भेटी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 15:36 PM
views 22  views

वैभववाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दरवर्षीच्या परंपरेनुसार वैभववाडी तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मंत्री राणे यांनी कोकिसरे येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर वैभववाडी पोलिस ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही त्यांनी भेट दिली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक उल्हास जाधव आणि फकरुद्दीन आगा यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

वैभववाडी शहरातील तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही राणे यांनी भेटी दिल्या. मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या उपक्रमांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. विविध मंडळांच्या वतीने राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे,जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, माजी संचालक दिगंबर पाटील, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपसभापती साची कोलते, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, उद्योजक विजय तावडे, प्राची तावडे, नेहा माईनकर,  राजेश गजोबार, उत्तम निकम, रवींद्र तांबे, राजन तांबे, गणेश मोहिते, मारुती मोहिते, मंगेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.