
सावंतवाडी : सहकारी पतपेढी मर्यादित, सावंतवाडी या संस्थेच्या सभासदांची ९४ वी अधिमंडळ वार्षिक बैठक श्रीराम वाचन मंदिर सभागृह सावंतवाडी येथे संस्थाअध्यक्ष रमेश बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. अध्यक्षांनी अहवालसाली उपस्थितांचे स्वागत करुन अहवाल सालात दिवंगत झालेले मान्यवर, सभासदांचे नातेवाईक, सभासद, नागरिक यांना श्रध्दांजली वाहिली.
सभा कामकाजात आर्थिक पत्रके व अहवालावर चर्चा होऊन आर्थिक पत्रके मंजूर करण्यात आली. सभेत सुमारे ७५ सभासदांनी सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून विशेष कार्यकारी अधिकारी संतोष गांवस यांच्या हस्ते सभासदांच्या पाल्यांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. गांवस यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.
सभेस सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, पिग्मी एजंट, सभासद सर्वश्री बाळासाहेब बोर्डेकर, नरेंद्र देशपांडे, अॅड. गोविंद बांदेकर, वासुदेव शिरोडकर, जयेश पोकळे, जितेंद्र मोरजकर, महेश भाट आदि उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत वारंग यांनी समारोपपर भाषण करुन सभाकामकाज संपल्याचे घोषित केले.












