LIVE UPDATES

वझरे ग्रामस्थांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक

आमदार दीपक केसरकर यांची कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून चर्चा; आठ जणांचे शिष्टमंडळ भेट घेणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 06:32 PM
views 101  views

दोडामार्ग : तालुक्यातील वझरे परिसरातील भूजल पातळी घटणे आणि नदीचे पाणी आटत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दोडामार्ग तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार दीपक केसरकर, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वेदांता कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने तोडगा काढण्याची सूचना आमदार केसरकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार बुधवारी कंपनीचे अधिकारी ग्रामस्थांच्या आठ जणांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत.

वझरे परिसरातील वेदांता कंपनीच्या बोअरवेलमुळे भूजल पातळी कमी होत असून, परिसरातील जिवंत नदीचा प्रवाहही आटत आहे. तसेच कंपनी त्यांचा सीएसआर फंड हा गावासाठी वापरत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रश्नावर कंपनीविरोधात भूमिका घेत ग्रामस्थांनी प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला आमदार दीपक केसरकर, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जि. प. सदस्य तथा भाजपा दोडामार्ग तालुकाप्रमुख दीपक गवस, पं. स. उपसभापती तथा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, पं. स. सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीला वेदांता कंपनीचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी मोबाईलद्वारे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत ग्रामस्थांच्या तक्रारींबाबत विचारणा केली.

"माझ्या मतदारसंघातील ग्रामस्थांच्या समस्या मार्गी लावणे हे माझे प्रमुख कर्तव्य आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर तत्काळ तोडगा काढावा," अशी स्पष्ट सूचना त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. तसेच बुधवारी वझरे येथे वेदांता कंपनीत ग्रामस्थांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. त्यानुसार आमदार केसरकर यांनी ग्रामस्थांच्या आठ जणांच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या समस्या सविस्तरपणे मांडाव्यात आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, असे सांगितले.


ताजी बातमी

View all

सावंतवाडी पोलिसांकडून संशयित महिला व पुरुषाचा शोध सुरू
October 30, 2026
वेर्ले येथील श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचा होणार कायापालट
October 30, 2026
Sindhudurg Vanrai Check Dam Campaign : सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Government Job : पन्नाशी ओलांडली तरी मिळेल सरकारी नोकरी
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

वेर्ले येथील श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचा होणार कायापालट
October 30, 2026
Sindhudurg Vanrai Check Dam Campaign : सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ
October 30, 2026
Charmakar Samaj members hand over ₹33,500 financial assistance to Sanjeev Nipanikar in Sawantwadi.
संकटात समाजबांधव धावले! संजीव निपाणीकरांना ३३ हजार ५०० रुपयांची मदत
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Kudal News : ३० कोटींच्या विकासकामांचा आमदार निलेश राणेंच्या हस्ते शुभारंभ
October 30, 2026