LIVE UPDATES

शेर्लेतील किराणा दुकानाला भीषण आग

८० लाखांचे नुकसान, पालकमंत्री नितेश राणेंकडून पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 12:14 PM
views 97  views
Nitesh Rane visits fire-damaged Eknath Dhuri grocery shop in Sherle, Sawantwadi, after a fire caused an estimated loss of ₹80 lakh.

सावंतवाडी : शेर्ले - दुकानवाडी येथे शनिवार रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मे. एकनाथ शंकर धुरी या किराणा दुकानाला भीषण आग लागून सुमारे ८० लाख रुपयांचे किराणा सामान जळून खाक झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. (Sherle Grocery Shop Fire)

शेर्ले माजी सरपंच उदय धुरी यांनी झालेल्या नुकसानी संदर्भात नितेश राणे यांना माहिती दिली. शासनामार्फत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी धुरी कुटुंबीयांना अभिवचन दिले. 

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या दुर्घटनेत दुकानाचे चार गाळे, आतील चार गोडाऊन खोल्या, किराणा साहित्य, भुसार माल आणि अन्य वस्तू जळून खाक झाल्यात. शिवाय दुकानाचा विमा नसल्याने धुरी कुटुंबीयावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, माजी उपसरपंच दीपक नाईक, बांदा माजी शहर अध्यक्ष बाबा काणेकर, युवा मोर्चाचे सिद्धेश कांबळी, अक्षय परब, अजित शेर्लेकर, गौरांग शेर्लेकर, राजेश चव्हाण, युवा सेना तालुकाध्यक्ष प्रशांत जाधव, तात्या पावसकर आदीसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

Maharashtra Government Approves 49 Educational Items Kit for Construction Workers' Children
Maharashtra Education Scheme : बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार
October 31, 2026
BJP councillors meet Sawantwadi police officials over fake MNGL gas connection calls and online OTP fraud targeting residents.
MNGL Gas Fraud in Sawantwadi : सावंतवाडीत एमएनजीएलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करा
October 31, 2026
वेंगुर्ल्यात १ नोव्हेंबर रोजी महारक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन
October 31, 2026
कुडाळमध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ५ किमी ‘रन फॉर युनिटी’
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Government Approves 49 Educational Items Kit for Construction Workers' Children
Maharashtra Education Scheme : बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार
October 31, 2026
BJP councillors meet Sawantwadi police officials over fake MNGL gas connection calls and online OTP fraud targeting residents.
MNGL Gas Fraud in Sawantwadi : सावंतवाडीत एमएनजीएलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करा
October 31, 2026
Kaka Kudalkar criticizes former MLA Vaibhav Naik while defending MLA Nilesh Rane over political remarks in Sindhudurg.
वैभव नाईक यांनी जनतेचा विश्वास गमावला म्हणूनच ते माजी आमदार झाले
October 31, 2026
घुंगुरकाठीतर्फे सिंधुदुर्गवासियांचा कसालमध्ये साहित्य सोहळा
October 31, 2026