LIVE UPDATES

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सिंधुदुर्गात दाखल

आमदार दीपक केसरकर व शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी केले स्वागत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 06, 2026 20:50 PM
views 52  views

कणकवली : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर येत असून गोव्यातील गोपा विमानतळावर आमदार दीपक केसरकर व शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. मंत्री दादा भुसे यांचा आज सावंतवाडीत मुक्काम असून उद्या सकाळी आठ ते बारा या वेळेत शाळांना भेटी देण्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मंत्री दादा भुसे यांचा कुडाळ, कणकवली व रत्नागिरी असा नियोजित दौरा आहे