LIVE UPDATES

कातवण शाळेजवळ ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारला बंधारा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 06, 2026 20:28 PM
views 42  views

देवगड : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कातवण येथील शाळेजवळ पाणी अडविण्यासाठी ग्रामस्थ, पालक व शाळेच्या संयुक्त सहभागातून बंधारा उभारण्यात आला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सुरेश साळुंके, उपशिक्षक शैलेश खाडिलकर, पदवीधर शिक्षक अमित जोशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, दिगंबर जोईल, उपाध्यक्ष सायली जोईल, समितीचे इतर पदाधिकारी तसेच सर्व पालक व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी डॉ. पारस जाधव, उपप्राचार्य नलिनी शांताराम पंत वालावलकर ज्युनिअर कॉलेज, देवगड यांनी उपस्थित राहून बंधारा उभारणीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना ‘कांदळवन जनजागृती’ या विषयावर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्या एकजुटीतून साकारलेला हा उपक्रम जलसंधारणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.