LIVE UPDATES

देवगड तालुका व्यापारी संघाचे व्यापाऱ्यांना आवाहन

पाणीटंचाई व दुष्काळ निवारणासाठी बंधाऱ्यांना प्लास्टिक पिशव्या विनामूल्य देण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 06, 2026 19:22 PM
views 21  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या निर्माण होत असलेली संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच लोकसहभागातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघासह देवगड तालुका व्यापारी संघ, देवगड तालुका महिला व्यापारी संघ आणि देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती या उपक्रमात सहभागी होत आहेत.

देवगड तालुक्यातील किराणा, बेकरी, कापड, हार्डवेअर तसेच अन्य व्यावसायिकांनी पाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी अडविणे, पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या या लोकसहभागाच्या उपक्रमात देवगड तालुक्यातील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.