साहेब रिसर्च सेंटरमध्ये MA मराठी - MA लोकप्रशासन अभ्यासक्रम

SPK महाविद्यालयात प्रवेश सुरू
Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 17:55 PM
views 50  views

सावंतवाडी : पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे एकमेव ठिकाण असलेल्या सावंतवाडीतील नामांकित साहेब रिसर्च सेंटर संलग्न असलेल्या  'A' श्रेणीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालय SPK कॉलेजमध्ये YCMOU चे नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यात एम्. ए. मराठी व एम्. ए. लोकप्रशासन हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.


यासह बीए, बीकॉम, एमकॉम अभ्यासक्रमासह रोजगाराभिमुख एका वर्षाचे डिप्लोमा कोर्स ही उपलब्ध आहेत. यात डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन,सिव्हिल सुपरवायझर,रुग्ण सहाय्यक यांचा समावेश आहे. शिक्षक क्षेत्रातील नोकरीच्या संधी,स्पर्धापरीक्षार्थीसाठी उपयुक्त,साहित्य क्षेत्रातील करीयरच्या संधी,माफक फी, मोफत पाठ्यपुस्तके,प्रतिष्ठित प्राध्यापकांची व्याख्याने,मोफत करिअर मार्गदर्शन,विशाल लायब्ररीचा निशुल्क लाभ,प्रवेशापासून ते परीक्षेपर्यंत स्टाफ कडून पूर्ण सपोर्ट ही या सेंटरची वैशिष्ट्य आहेत. आजच SPK कॉलेजला (मो.९६०७७०७२६०) भेट देत आपला प्रवेश निश्चित करा अस आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी साहेब रिसर्च सेंटर, मेन बस स्टँड जवळ, ८०५५७१५७४९  / ९०११११५७४९ संपर्क साधण्याच आवाहन केले आहे.