LIVE UPDATES

Dr. Apoorva Basur : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांची दोडामार्ग केंद्रशाळा नं. १ ला भेट

छत्रपती शिवरायांवरील स्पृहा दळवीच्या प्रभावी भाषणाने सीईओ भारावल्या; विद्यार्थिनीचे भरभरून कौतुक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 06:52 PM
views 87  views
Dr Apoorva Basur appreciates student Spruha Dalvi's speech on Chhatrapati Shivaji Maharaj during her visit to Dodamarg school.

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी आज दोडामार्ग येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा दोडामार्ग नंबर १ या प्रशालेला भेट देत शाळेतील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच विविध कलागुणांची माहिती जाणून घेतली.

या भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थिनी कु. स्पृहा दळवी हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषण सादर केले. शिवरायांचा इतिहास, त्यांचे शौर्य, स्वराज्याची संकल्पना आणि प्रेरणादायी विचार आपल्या ओघवत्या वाणीमध्ये मांडताना स्पृहाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

स्पृहाचे भाषण ऐकून डॉ. अपूर्वा बासूर यांनी तिचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये असलेली वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि ऐतिहासिक विषयांची जाण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे या प्रसंगातून अधोरेखित झाले.

यावेळी त्यांनी शाळेच्या भौतिक गरजांचीही माहिती जाणून घेतली. शाळेच्या आवश्यक भौतिक गरजांची पूर्तता करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता यावे, यासाठी त्यांना अधिकाधिक मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


ताजी बातमी

View all

देवगड किल्ला परिसरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा
November 25, 2026
Kankavli Land Dispute Assault Case : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी
November 25, 2026
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे परिसरात पावसाच्या हलक्या सरी
November 25, 2026
दोडामार्ग नगरपंचायतीच्या वाढीव कामावर तिसऱ्यांदा नगरसेवकांचा हातोडा
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे परिसरात पावसाच्या हलक्या सरी
November 25, 2026
दोडामार्ग नगरपंचायतीच्या वाढीव कामावर तिसऱ्यांदा नगरसेवकांचा हातोडा
November 25, 2026
दहा दिवसांत दोडामार्ग-विजघर रस्त्याचे काम सुरू करा
November 25, 2026
Chindar village in Malvan prepares for the traditional Gavpalan ritual beginning December 2, 2026.
Chindar Gavpalan 2026 : चिंदर गावची पारंपरिक गावपळण २ डिसेंबरपासून
November 25, 2026