
सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य होते. यामुळे प्रवाशांना चिखलातून ये-जा करावी लागत होती. याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणेंनी बस स्थानकावरील खड्डे तत्काळ बुजविण्याचे एसटी प्रशासनाला आदेश दिले होते. यानंतर सावंतवाडी बस स्थानकामधील खड्डे एसटी विभागाकडून भरून घेण्यात आले आहेत.











