LIVE UPDATES

१०० टक्के कर्ज वसुलीबद्दल कोलगाव विविध सहकारी संस्थेचा गौरव

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 18:39 PM
views 79  views

सावंतवाडी : बँक स्तरावर ३० जुन २०२६ अखेर १०० टक्के वसूल पात्र कर्जाची पूर्णपेड झाल्यामुळे कोलगाव विविध सहकारी संस्थेचा सिंधुदुर्ग बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

सावंतवाडी येथील मंगिरीश हॉलमध्ये मंगळवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्ग बँकेचे चेअरमन मनिष दळवी, बँकेचे संचालक महेश सारंग, संचालक रवी मडगावकर, बँक संचालक विद्याधर परब या मान्यवरांच्या हस्ते कोलगाव विविध सहकारी संस्थेचे चेअरमन विरेंद्र धुरी, सचिव रामा म्हैसकर, संचालक बाबुराव चव्हाण, रविंद्र राऊळ, रामा पालव, चंद्रकांत सावंत यांचा सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.