LIVE UPDATES

सावंतवाडीतील पर्यटन विकास व नगरपालिकेचे विविध प्रकल्प कौतुकास्पद

चिपळूणच्या नगरसेविकांची सावंतवाडी नगरपरिषदेला सदिच्छा भेट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 12:03 PM
views 40  views

सावंतवाडी : चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविकांनी सावंतवाडी नगरपरिषदेला सदिच्छा भेट देत शहरातील विविध विकास कामे तसेच स्थानिक पर्यटनस्थळांची पाहणी केली. यावेळी सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या आणि आगामी काळात प्रस्तावित असलेल्या विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती नगरसेविकांनी घेतली.

या भेटीदरम्यान सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींनी चिपळूणच्या नगरसेविकांचे स्वागत केले. सभापती आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, दीपाली भालेकर आणि प्रतीक बांदेकर यांनी सावंतवाडी शहरातील सुरू असलेल्या तसेच आगामी विकास प्रकल्पांची माहिती दिली. त्यानंतर चिपळूणच्या नगरसेविकांनी सावंतवाडीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देत शहरातील पर्यटन विकासाची पाहणी केली.

सावंतवाडीतील पर्यटन विकास व नगरपालिकेचे विविध प्रकल्प कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी चिपळूणच्या नगरसेविकांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेविका रसिका देवळेकर, राणी महाडिक, हर्षदा पवार, अंजली कदम, वैशाली निमकर, सफा गोठे, निलम जाधव, नसरीन खडस, कांचन शिंदे, सौ. देसाई यांच्यासह अन्य नगरसेविका तसेच उद्यान विभाग प्रमुख बाबू साडविलकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.