LIVE UPDATES

Kankavli News : नियोजित वेळ संपली, तरी कणकवली अंधारातच!

महापारेषणच्या तांत्रिक कामाचा नागरिकांना फटका; सायंकाळी सात वाजूनही वीजपुरवठा पूर्ववत नाही
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 16, 2026 07:22 PM
views 136  views
 Power outage in Kankavli town and nearby villages due to electricity maintenance work

कणकवली : महावितरणकडून तांत्रिक कामासाठी सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी कणकवली शहरासह परिसरातील गावांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, नियोजित वेळ संपूनही सायंकाळी सात वाजून गेल्यानंतर कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांमधील वीजपुरवठा पूर्ववत झालेला नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

महापारेषणच्या १३२/३३ केव्ही कणकवली अतिउच्चदाब उपकेंद्राच्या वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या सर्व ३३ केव्ही उच्चदाब वाहिन्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली होती. परिणामी, कणकवली शहर व परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या ३३/११ केव्ही कणकवली उपकेंद्राचाही वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

मात्र, सकाळी नऊ वाजल्यापासून बंद असलेला वीजपुरवठा सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पूर्ववत होणे अपेक्षित असताना सात वाजूनही वीजपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिवसभर वीज नसल्याने व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार तसेच घरगुती ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, वीजपुरवठा नेमका कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महावितरणने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.


ताजी बातमी

View all

Kankavli News : कणकवलीत पुण्यातील मद्यधुंद महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा
November 16, 2026
TVS ज्युपिटर स्कूटर कोण जिंकणार? ग्राहकांची उत्सुकता शिगेला
November 16, 2026
पीक कर्ज प्रमाणात वाढ करणेबाबत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार
November 16, 2026
Maharashtra subordinate court employees announcing an indefinite strike over salary demands
Maharashtra Court Employees Strike : समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार
November 16, 2026
संबंधित बातम्या

View all

पीक कर्ज प्रमाणात वाढ करणेबाबत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार
November 16, 2026
सोनुर्ली शाळा नंबर १ च्या नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन
November 16, 2026
 Julekha Shaikh reunites with her husband after being traced with the help of AI tools in Sindhudurg
कुटुंबीयांनी आशा सोडली...तंत्रज्ञानाने घडवले अशक्य ते शक्य!
November 16, 2026
Filmmaker Umesh Kulkarni participates in rock art cleaning drive at Kudopi in Sindhudurg
कातळशिल्पांचा वारसा जपण्याचा 'घुंगुरकाठी' आणि ग्रामस्थांचा उपक्रम आशादायक: उमेश कुलकर्णी
November 16, 2026