
कणकवली : परिवहन मंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व मा. पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग विभागातील कणकवली बसस्थानकाच्या २०० मीटर परिक्षेत्रातील खाजगी वाहतुक करणाऱ्या सहासीटर, रिक्षा व ट्रॅव्हलर चालकांना कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाच्याखाली एकत्रित करुन महामंडळाच्या २०० मीटर परिक्षेत्राच्या बाहेरुन प्रवाशी वाहतुक करणेबाबत तसेच २०० मीटर परिक्षेत्रात प्रवाशी वाहतुक करतांना आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल.
सदर वेळी सिंधुदुर्ग विभागातील महेंद्र शिवाजीराव टापरे सुरक्षा व दक्षता अधिकारी यांचेसमवेत श्री अजय गायकवाड आगार व्यवस्थापक कणकवली आगार तसेच सतिश तिवडे राखण व पहारा निरीक्षक, श्रीनिवास कदम सहाय्यक वाहतुक अधिक्षक, श्री तांबे वाहतुक नियंत्रक, श्री चव्हाण वाहतुक नियंत्रक, श्री पावसकर वाहतुक नियंत्रक, अर्जुन कांबळे सुरक्षा रक्षक व कणकवली आगारातील रा.प. कर्मचारी उपस्थिती होते.
महामंडळाचे उत्पन्न वाढविणे, अवैध प्रवाशी वाहतुकीवर नियंत्रण करणे आणि प्रवाशांना सुरक्षित सेवा उपलब्ध करुन देणे याच उद्देशाने सदरची मोहिम राबविण्यात येत आहे. असल्याचे महेंद्र शिवाजीराव टापरे, सुरक्षा व दक्षता अधिकारी, राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभाग यांच्याकडून सांगण्यात आले.










