LIVE UPDATES

देवगडमध्ये मान्सूनचं दमदार आगमन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 07, 2026 19:22 PM
views 127  views

देवगड : देवगड तालुक्यात आज सायंकाळी मान्सूनचे दमदार आगमन झाले. तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. काल देखील तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. आज सायंकाळी जवळपास तासभर पाऊस कोसळला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील ठिकठिकाणी परिसरात पावसाच्या काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर चिखलमाती आल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.मागील वर्षी मे महिन्याच्या अंदाजे १५ तारखेपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तालुक्यावरील पाणी टंचाईचे संकट टळले होते. मात्र, यावर्षी मे महिना संपून 6 जून उजाडला तरी ही पावसाचे आगमन झाले नाही. शेतकरी शेतीची जय्यत तयारी करून आकाशाकडे नजरा लावून बसले होते. अखेर रविवारी सायंकाळपासून आकाश ढगांनी व्यापले. आणि सायंकाळी पावसाला सुरुवात झाली.