
सावंतवाडी : देव, देश आणि धर्म यासाठी कार्यरत असणाऱ्या शिवशंभू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नूतन कार्यकारिणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी जाहीर केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा जय भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रायगड जिल्हाध्यक्ष पदी यश घरत यांची निवड करण्यात आली आहे. सोशल मीडिया राज्य प्रमुख पदी सीताराम कळंबे यांची निवड करण्यात आली आहे.
समाजात देव, देश आणि धर्म याच्यासाठी कार्यरत असणाऱ्या या शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. हेच कार्य पुढे चालविण्याची जबाबदारी नूतन पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून जय भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जय भोसले हे पत्रकार म्हणून कार्यरत असून व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील क्रिकेट कॉमेंटरेटर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी संघटनेचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. जय भोसले यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.











