LIVE UPDATES

जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीपदी प्राजक्ता बांदेकर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 11:51 AM
views 26  views

कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांची सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.  

जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून याबाबतचे अधिकृत पत्र पाठविण्यात आले असून, शासनाच्या शासन निर्णयातील कार्यक्षेत्रानुसार त्यांची उपस्थिती व सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पालकमंत्री तथा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या समितीच्या बैठकीची तारीख, वेळ व स्थळ निश्चित झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य विषयक उपक्रमांना अधिक गती मिळणार असून, प्राजक्ता बांदेकर यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.