
सिंधुदुर्गनगरी : भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयतर्फे स्वयंसेवक या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदाच्या भरतीसाठी जिल्ह्यातील युवक वा युवतींना www.nyks.nic.in या वेबसाईटवर ५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे. या पदासाठी शिक्षण कमीत कमी १० वी पास व वयोमर्यादा दि. १ एप्रिल, २०२५ रोजी १८ पेक्षा जास्त व 29 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी कामगार असू नये. स्वयंसेवक मानधन दर महा 5 हजार रुपये आहे. स्वयंसेवक हा त्याच तालुक्यातील रहिवासी असावा. पगाराची नोकरी नाही किंवा स्वयंसेवक कायदेशीररीत्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल. अधिक माहिती व अर्ज www.nyks.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट, २०२६ असेल. अधिक माहितीसाठी मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी १० ते सायं ५) मोबाईल नं. ९४२१२६७०११ संपर्क साधावा.














