
सावंतवाडी : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणूक -2026 च्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य ॲड. संग्राम देसाई भरघोस मतांनी पहिल्या पसंतीची मते घेत ६ व्या क्रमांकावर निवडून आले. ॲड. असीम सरोदे यांच्या सारख्या प्रवृत्तीला ही चपराक आहे असं मत जिल्हा वकील संघ अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले
महाराष्ट्र व गोवा राज्यात सर्वात लहान जिल्हा व वकील सदस्य संख्या किमान असूनही ऐकूण 25 सदस्यांपैकी ६ व्या क्रमांकाने निवडून येणं ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यासाठी सर्व मतदारांचे आभार मानत असून जिल्ह्याच्या एकजुटीचा हा विजय आहे. ॲड. असीम सरोदे यांच्या सारख्या प्रवृत्तीला ही चपराक आहे. तर ॲड. संग्राम देसाई यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाची ही पोचपावती असुन खंडपीठ -विविध न्यायालय निर्मिती -ऍडव्होकेट ट्रैनिंग अँड रिसर्च सेंटर व वकील वर्गासाठी घेतलेले हितवर्धक निर्णय व पदाला दिलेला न्याय याचीच विजय ही परिणीती असल्याची भावना सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघ अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी व्यक्त केली.












