LIVE UPDATES

मळेवाड परिसरातील १७ दिवसांच्या गणरायाचे विसर्जन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 01, 2026 11:28 AM
views 27  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : मळेवाड परिसरातील १७ दिवसांच्या गणरायाचे आज भक्तिमय वातावरणात वाजत-गाजत विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

गेले सतरा दिवस मनोभावे पूजा अर्चा भजन फुगड्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर काही ठिकाणी हालते देखावे, आरास सजावट यामुळे वातावरण अधिकच खुलून दिसत होते. श्री गणेश उत्सवात वातावरण भक्तीमय झाले होते. 

यावेळी महिलांनी तसेच लहान मुलांनी पारंपरिक फुगड्या खेळत उत्साहात सहभाग घेतला. तसेच गणरायाची आरती करून भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या १७ दिवसांच्या कालावधीत मनोभावे पूजा-अर्चा, भजन, फुगड्या यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीत परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला यावेळी निरोप देण्यात आला.