LIVE UPDATES

Dodamarg News :दोडामार्ग वनविभागासमोरील उपोषण चौथ्या दिवशीही सुरू

वनविभागाशी चर्चा निष्फळ; उपोषणकर्ते मागण्यांवर ठाम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 05:12 PM
views 80  views

दोडामार्ग : तालुक्यात वन्य हत्तींसह अन्य वन्यप्राण्यांकडून शेती व फळबागांचे होणारे नुकसान, नुकसानभरपाई मिळण्यास होणारा विलंब, पंचनाम्यांमध्ये फेरफार तसेच वनविभागाच्या विविध योजनांमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून वनविभागाच्या कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच आहे. सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी उपोषणकर्त्यांशी केलेली चर्चा निष्फळ ठरल्याने चौथ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण सुरू होते.

दोडामार्ग तालुक्यात हत्ती, रानडुक्कर, गवे, माकडे, साळींदर आदी वन्य प्राण्यांकडून भात, शेतीसह काजू, नारळ, सुपारी, केळी आणि अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पुरेशी आणि वेळेत नुकसान भरपाई मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. नुकसान झाल्यानंतर पंचनामे करण्यास विलंब होणे तसेच पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय फेरफार केल्याचे आरोप व इतर विविध मागण्यांसाठी बांबर्डे येथील शेतकरी दौलत राणे, सिद्धेश राणे व मदन राणे यांनी बुधवारपासून येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली.

या उपोषणात विनिता घाडी आणि जेनिफर लोबो यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. तर शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख संजय गवस, नगरसेवक चंदन गावकर, संदीप गवस, स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस, बाळा धाऊसकर, प्रदीप चांदेलकर, सुभाष दळवी यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी उपस्थिती दर्शवली.

चर्चा ठरली निष्फळ

उपोषणाच्या चौथ्या दिवशी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. नुकसानभरपाईची रक्कम वाढविण्याची मागणी यापूर्वीच शासनाकडे प्रस्तावाद्वारे पाठविण्यात आली असून, त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हँगिंग फेन्सिंगसारख्या उपाययोजना काही गावांमध्ये उपयुक्त ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वनरक्षक शुभम वारके यांच्यावरील आरोपांबाबत बोलताना, संबंधित पुरावे सादर करावेत. त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे बोराटे यांनी सांगितले. इतर तक्रारींचे पुरावेही दिल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हत्ती पकडण्याच्या मोहिमेला न्यायालयीन स्थगिती

मोर्ले येथील घटनेनंतर ओंकार हत्तीला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या मोहिमेविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसमोर जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने हत्ती पकड मोहिमेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे हत्ती पकडण्याची मोहीम थांबली असल्याची माहिती वैभव बोराटे यांनी दिली.

पंचनामे जनतेसमोर आणण्याची मागणी
उपोषणकर्त्यांनी वैभव बोराडे यांना सर्व पंचनामे घेऊन येण्याची मागणी केली. वन अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात खोडसाळपणा केला आहे की‌ नाही? ते सर्व जनतेसमोर येऊ दे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली. मात्र वन अधिकाऱ्यांनी या मागणीकडे कानाडोळा केल्याने उपोषणकर्ते संतप्त झाले.

आता 'आर या पार' वर उपोषणकर्ते ठाम

प्रशासनाकडून चर्चा होत असली, तरी प्रत्यक्षात मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांनी जाब विचारला. वनरक्षक शुभम वारके यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासन आणि उपोषणकर्ते यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


ताजी बातमी

View all

सिंधुदुर्गातील अभाअनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतले भांडाफोड प्रशिक्षण
October 24, 2026
 Pankaj Advani Wins 29th World Title, Defeats Rob Hall in Billiards Final
Pankaj Advani : पंकज अडवाणीने २९ वे विश्वविजेतेपद जिंकून घडवला नवा इतिहास
October 24, 2026
देवगडच्या एस. एच. केळकर महाविद्यालयाची ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी
October 24, 2026
देवगडमध्ये २५ ऑक्टोबरला भव्य रक्तदान शिबिर
October 24, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्गातील अभाअनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतले भांडाफोड प्रशिक्षण
October 24, 2026
देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा
October 24, 2026
MNS district president Adv. Anil Kesarkar raises concerns over the audit report and alleged irregularities in the Sawantwadi water supply project.
Sawantwadi News : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेचा थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट संशयास्पद
October 24, 2026
MLA Bhaskar Jadhav reviews compensation and rehabilitation work for Yelondewadi Dam project-affected families
Yelondewadi Dam : येलोंदेवाडी धरणग्रस्तांना ९५ कोटींचा मोबदला मिळवून दिला
October 24, 2026