
देवगड : फ्रेंडस् सर्कल देवगड सडा यांच्यावतीने ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता फ्रेंडस् सर्कल नाका, देवगड येथे भव्य नरकासूर स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुला गट आणि मिनी नरकासूर अशा दोन गटांत होणार असून, विजेत्या स्पर्धकांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी १२ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ८ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ४ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. मिनी नरकासूर गटात प्रथम क्रमांकाला १,५०० रुपये, द्वितीय क्रमांकाला १ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ५०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट एन्ट्रीसाठी एक हजार रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.
स्पर्धेसाठी खुल्या गटातील नरकासूराची कमाल उंची १२ फूट, तर मिनी नरकासूराची उंची ३ फूटांपर्यंत असणे आवश्यक आहे. खुल्या गटातील चलचित्र नरकासूराची उंची स्पर्धास्थळी पोहोचल्यानंतर वाढविता येईल. सर्व स्पर्धकांनी आपले नरकासूर रात्री १० वाजेपर्यंत स्पर्धास्थळी आणणे बंधनकारक आहे. त्यानंतर येणाऱ्या स्पर्धकांचे १० गुण कमी करण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला किंवा मंडळाला सादरीकरणासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. स्पर्धास्थळी नरकासूर दहन करण्यास मनाई आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी ५ नोव्हेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी आदेश बांदेकर (७२६२०११७०८) किंवा चरण काटोकर यांच्याशी संपर्क साधावा. कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी स्पर्धक मंडळे आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन फ्रेंडस् सर्कल मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








