
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या निधीतून कुडाळ मच्छीमार्केटमधील प्रलंबित असलेल्या फ्लोरिंग दुरुस्तीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या कामाची नुकतीच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली असून, गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यामुळे मच्छीमार विक्रेते व भगिनींनी समाधान व्यक्त केले आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या वार्षिक ठेकेदारामार्फत हे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. पाहणी प्रसंगी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, स्थानिक नगरसेविका नयना मांजरेकर, कुडाळ शहर मच्छीमार विक्रेते अध्यक्ष, मच्छी विक्रेत्या भगिनी तसेच नगरपंचायतीचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
मच्छीमार्केटमधील फ्लोरिंगची दुरवस्था झाल्याने विक्रेत्यांना व ये-जा करणाऱ्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मच्छीमार विक्रेत्यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या मागणीची तत्परतेने दखल घेत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी निधी उपलब्ध करून दिला, तर स्थानिक नगरसेविका नयना मांजरेकर यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला.
नागरिकांच्या आणि विक्रेत्यांच्या समस्यांची त्वरित दखल घेऊन त्या मार्गी लावण्याच्या नगराध्यक्षांच्या कार्यतत्परतेचे आणि नगरसेविकांच्या पाठपुराव्याचे मच्छीमार विक्रेते व भगिनींकडून विशेष कौतुक करण्यात आले. या दुरुस्तीमुळे मच्छी विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला असून, कुडाळ नगरपंचायतीच्या या सकारात्मक कार्यपद्धतीबद्दल नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








