
मालवण : हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी कट्टा येथे उत्साहात संपन्न झाली. प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ. मीनल विजय पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला तब्बल ५९० महिला उपस्थित होत्या. सभेला प्रमुख पाहुण्या म्हणून मालवण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुमेधा पाताडे, पंचायत समिती सदस्य श्री. गावडे, तालुका अभियान व्यवस्थापक श्री. रविकिरण कांबळे, तालुका व्यवस्थापक श्री. साळवे, प्रभाग समन्वयक श्री. विरेश पवार, तालुका ब्लॉक अँकर श्री. सचिन किर्लोस्कर तसेच प्रभाग सचिव सौ. सीता मेस्त्री उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुमेधा पाताडे यांनी प्रत्येक ग्रामसंघाला स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे बचतगट व ग्रामसंघांच्या कामकाजाला अधिक सुसूत्रता आणि गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सभेची प्रस्तावना प्रभाग सचिव सौ. सीता मेस्त्री यांनी केली. यावेळी सौ. प्राजक्ता नाईक यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. सूत्रसंचालन सौ. प्रिया पांडुरंग आंगणे यांनी केले.महिलांची मोठी उपस्थिती आणि उत्स्फूर्त सहभागामुळे हिरकणी प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.











