LIVE UPDATES

Vengurla News : वेतोरे पालकरवाडीत आग लागून घराचे मोठे नुकसान

सरपंच बंड्या पाटील यांच्याकडून तातडीची आर्थिक मदत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 09, 2026 05:26 PM
views 101  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील पालकरवाडी कार्यक्षेत्रातील रहिवासी अजय कृष्णा गोसावी यांच्या मांगरवजा घराला रविवारी रात्री आकस्मिक आग लागून मोठे नुकसान झाले आहे.यात छप्परसह ग्रासकटर, वेल्डिंग मशीन, कपडे, भांडी, मिक्सर आदी साहित्य जळून सुमारे 2.50 लाखाचे नुकसान झाले आहे.याबाबत माहिती मिळताच समिर गोसावी, मंगेश गोसावी, योगेश परब, अनिल गोसावी, दयानंद परब, प्रवीण परब, सुरेश गोसावी अर्जुन परब, आकाश परब व अन्य ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी तातडीने धाव घेऊन सहकार्य केले.

सोमवारी सकाळी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु होती. सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील यांनी नुकसानग्रस्ताला तातडीची आर्थिक मदत दिली. दरम्यान आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.  दरम्यान संबंधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असुन सामाजिक स्तरावरून आर्थिक सहकार्य होणे आवश्यक आहे.