LIVE UPDATES

गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना ब्लँकेट, चटई

आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप : तलावली आणि सावरखिंड येथे सामाजिक उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 26, 2026 03:39 PM
views 45  views

देवगड : गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘सेवा, स्नेह आणि मानवता’ या भावनेतून २४ ऑक्टोबर २०२६ रोजी तलावली आणि सावरखिंड येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना ब्लँकेट व चटई, तसेच आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

तलावली येथे सकाळी ८.३० वाजता, तर सावरखिंड येथे सकाळी १०.३० वाजता वाटप कार्यक्रम झाला. परिसरातील विविध गावे आणि पाड्यांमधील गरजू लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. फाऊंडेशनच्या या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांसह आदिवासी महिलांना आवश्यक मदत मिळाली. मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘समाजासाठी आपले सहकार्य अत्यंत मोलाचे आहे,’ असा संदेश देत फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न यावेळी केला आहे.