LIVE UPDATES

choukul news : चौकुळ येथे समाज मंदिर भूमिपूजन कार्यक्रम

शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडेंच्या हस्ते भूमिपूजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 26, 2026 02:53 PM
views 159  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : चिखलवाळ-बेरडकी, चौकुळ येथे समाज मंदिराचे भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. चिखलवाळ-बेरडकी, चौकुळ येथे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून होणाऱ्या समाज मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नंदू गावडे, भाऊ जाधव, बुधाजी नाईक, मोहन नाईक, नितीन गावडे, सोमा गावडे, सोमनाथ गावडे, नितीन गावडे,अजित गावडे, युवराज नाईक इतर सर्व बेरड समाजातील अन्य बांधव उपस्थित होते. समाज मंदिराच्या माध्यमातून समाजातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे समाजातील एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत होईल. समाजाच्या विकासासाठी एकजूट, सामाजिक प्रगतीसाठी नवी सुरुवात असल्याची भावना गावडे यांनी व्यक्त केली.