LIVE UPDATES

वैभववाडी महाविद्यालयात मोडी लिपी कागदपत्रांचे भव्य प्रदर्शन

खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त २० व २१ जुलै रोजी आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 17, 2026 18:42 PM
views 26  views

वैभववाडी : महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार विनोद तावडे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त "मोडी लिपी कागदपत्रांचे भव्य प्रदर्शन" आयोजित करण्यात आले आहे. पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम २० व मंगळवार,  २१ जुलै रोजी  आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे  आयोजित करण्यात आला आहे.

  या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी (दि. २०) सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाचे सहाय्यक संचालक गणेशकुमार वि. खोडके (कोल्हापूर पुरालेखागार), संशोधन सहाय्यक विक्रम म. ठमके (पुणे पुरालेखागार) यांच्यासह रोहित मा. जाधव, रोहित अ. खोले आणि सतिश यादव हे उपस्थित राहणार आहेत.

 या प्रदर्शनात ऐतिहासिक वारसा जपणारी दुर्मीळ मोडी लिपीतील कागदपत्रे पाहण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी, संशोधक, इतिहास अभ्यासक तसेच इतिहासप्रेमींसाठी हे प्रदर्शन विशेष पर्वणी ठरणार आहे.या प्रदर्शनाचा लाभ  तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण आणि इतिहास विभाग प्रमुख प्रा. एस. एन. पाटील यांनी केले आहे.