
सावंतवाडी : लोकमान्य प्रा. मधु दंडवते टर्मिनस म्हणून नाव देण्याचा निर्णय घेतला असून ते लवकर दिलं जाव तसेच त्यांचे नाव एखाद्या एक्स्प्रेसला द्यावं अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा विचार करून पुणे - सावंतवाडी रेल्वे सुरू करण्याचा विचार करावा अशीही मागणी त्यांनी यानिमित्ताने केली.
ते म्हणाले, नियमित एक्स्प्रेस'चे सावंतवाडीत आगमन झाले असून त्याचे स्वागत केले आहे. ती वेळेपूर्वी दाखल केल्याने रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन देखील केले. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने रेल्वे प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेईलच. तसेच रेल्वे स्थानकावरील पाण्याचा प्रश्न प्रलंबित असून तो वेगाने सोडविण्याचे पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले असून त्या पद्धतीने काम व्हावे.
लोकमान्य प्रा. मधु दंडवते टर्मिनस म्हणून नाव देण्याचा निर्णय घेतला असून ते दिलं जाव तसेच त्यांचे नाव एखाद्या एक्स्प्रेसला द्यावं. कारण, त्यांनी आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी घेतलेल्या मेहनतीच कोकण रेल्वे धावू शकली. आज मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती बघता ते उदाहरण या निमित्ताने देता येईल. कोकण रेल्वेच स्वप्न पुर्ण झालं असून त्याला दंडवतेंच योगदान विसरता येणार नाही. तसेच पुणे येथे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जात असून पुणे सावंतवाडी अशी रेल्वे देखील सुरू करावी. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर प्रस्तावित ट्रॅक देखील उभारण्यात यावे व हा प्रवास जलद गतीने व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
तर, आजचा क्षण ऐतिहासिक असून प्लॅटफॉर्म, ट्रॅक आणि पाण्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. यामुळे ही रेल्वे लवकर दाखल होईल. तसेच केंद्र शासनाकडून साडेचार कोटींचा निधी कोकण रेल्वेला मंजूर केला असू़न त्यात कोकण रेल्वेकडून सावंतवाडीचा उल्लेखही व्हावा अशी मागणी सचिव मिहीर मठकर यांनी केली.











