
सावंतवाडी : बऱ्याच वर्षांनंतर सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा ६ ऑगस्ट रोजी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात ही सभा संपन्न होणार आहे.
सावंतवाडी पंचायत समितीवर आमदार दीपक केसरकर आमदार झाल्यापासून प्रथमच त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा झेंडा फडकला असून, सुस्मिता जाधव या सभापतीपदी विराजमान आहेत. सध्या पंचायत समितीवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. ६ ऑगस्ट रोजी ११. वा. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात ही सभा संपन्न होणार आहे.












