
दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून धरण क्षेत्रातील अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्यांद्वारे दिनांक 24 जुलै पासून तिलारी नदीत सोडण्यात येणार असून त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिनांक 24 जुलैपासून नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कधीही वाढू शकतो त्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी व गाव पातळीवर दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा देऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे .











