LIVE UPDATES

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी केली गटार बांधकामांची पाहणी

दर्जेदार व वेळेत कामे पुर्ण करणेबाबत सूचना
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 18:59 PM
views 30  views

मालवण : मालवण नगरपरिषद माध्यमातून शहरातील मेढा भागात हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कुल कॉर्नर पर्यत गटार बांधकाम सुरु आहे. यांसह गटार बांधकामांची पाहाणी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी गुरुवारी केली. दर्जेदार कामालाच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहाराच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासाला प्राधान्य दिले जात असताना मोठया प्रमाणात विकासनिधी प्राप्त होतं आहे. अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. विकासकामे होतं असताना ती दर्जेदार आणि वेळेत व्हावीत याला सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहाराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटीबद्ध आहोत. असे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी यावेळी सांगितले.