LIVE UPDATES

पावसाळ्यात हेल्मेट स्वच्छ ठेवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

helmet cleaning guide : पावसाळ्यात हेल्मेट ओले झाल्याने त्याच्या आतून तीव्र कुबट वास येतो त्यामुळे हेल्मेटचा पावसाळ्यात वापर करताना थोडा त्रास होतो. पण तुम्ही काही सोप्या पध्दतींचा वापर करुन पावसाळ्यातही हेल्मेट स्वच्छ ठेवू शकता.
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 23, 2026 19:04 PM
views 31  views

Helmet Care Tips : दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण नेहमी वाढतानाच दिसते. दुचाकीवरुन अपघात झाल्यानंतर पडल्यास मेंदुला इजा होण्याची शक्यता असते. डोक्याला गंभीर इजा होऊ नये यासाठी हेल्मेट वापरणे गरजेचे असते. उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात हेल्मेट वापरणे सोईचे ठरते. मात्र, पावसाळ्यात हेल्मेट ओले झाल्याने त्याच्या आतून तीव्र कुबट वास येतो त्यामुळे हेल्मेटचा पावसाळ्यात वापर करताना थोडा त्रास होतो. पण तुम्ही काही सोप्या पध्दतींचा वापर करुन पावसाळ्यातही हेल्मेट स्वच्छ ठेवू शकता. चाला तर या सोप्या पध्दती जाणून घेऊया.

हेल्मेट रोज वापरणाऱ्या चालकांनी पावसाळ्यात हेल्मेट दर आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे गरजेचे आहे. तसेच त्यातील पॅडची स्थिती तपासणे गरजेचे आहे. ते जुने तसेच फाटले असतील तर ते बदलणे गरजेचे आहे.  पावसाळ्यात हेल्मेट भिजल्याने त्याच्या आतील पॅडला खूप दुर्गंधी येते. हे हेल्मेट व्यवस्थित न सुकल्याने त्यात बुरशी वाढण्याचा धोका असतो. ते स्वच्छ न केल्यास केसांच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता असते. हेल्मेटच्या आतील पॅड भिजल्यास तो काढून साबणाने धुवून पुर्ण सुकल्यानंतर हेल्मेटमध्ये लावावा.

हेल्मेटच्या आतील वास कमी करण्यासाठी तीव्र सुगंधाचे परफ्यूम किवा हेल्मेट सॅनिटायझर स्प्रेचा वापर केला जाऊ शकतो. हेल्मेट ओले असल्यास बाईकच्या डिक्कीत किंवा बंद जागेत ठेऊ नका. ते ओले हेल्मेट हवेशीर व मोकळ्या जागेत ठेऊन सुकुद्या. तसेच हेल्मेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ ठेवणे टाळा. तसे न केल्यास बाहेरील आवरण तसेच आतमधील फोम खराब होण्याची शक्यता असते. ओले हेल्मेट सुकल्याने त्यात जिवाणू वाढीचा धोका कमी होतो.

ओल्या केस किंवा जास्त घाम येत असल्यास हेल्मेट घातल्यास आतमध्ये ओलावा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे हेल्मेट घालण्यापूर्वी आपले केस आणि डोके स्वच्छ ठेवा. शक्य असल्यास सुती हेल्मेट कॅप घालण्याचा प्रयत्न करा. ही टोपी वापरल्यास घाम शोषून घेते.