LIVE UPDATES

गौतमेश्वर प्रासादिक मंडळाचा मुंबईत सन्मान

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 08, 2026 20:00 PM
views 47  views

वेंगुर्ला : ६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवातील प्राथमिक फेरीत  वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली येथील गौतमेश्वर प्रासादिक नाट्य मंडळाने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळसच्यावतीने सादर केलेल्या “सुनबाई तोऱ्यात” या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला होता. याचे पारितोषिक वितरण नुकतेच मुंबई येथे संपन्न झाले. “सुनबाई तोऱ्यात” या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि ८० हजार रक्कमेचा धनादेश, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच या नाटकातील दिग्दर्शन प्रथम-राजेश गोवेकर, प्रकाश योजना प्रथम-यश मांजरेकर, नेपथ्यरचना प्रथम-अर्जुन (दादा) हळदणकर, रंगभूषा प्रथम-निलेश चेंदवणकर यांना तसेच दत्ताराम गोेवेकर आणि विधी नाईक यांना अभिनय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षिस वितरणाचा कार्यक्रम रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी-मुंबई येथे संपन्न झाले. या यशाबद्दल गौतमेश्वर प्रासादिक नाट्य मंडळाचा, त्यातील सर्व कलाकारांचा तसेच तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या व्यक्तींचे अभिनंदन होत आहे.