LIVE UPDATES

दीपक केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त २० जुलैला मोफत महाआरोग्य शिबीर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांची माहिती
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 12:34 PM
views 43  views

सावंतवाडी : के.एल.ई हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबीर होत आहे. १०० डॉक्टर उपस्थित राहणार असून ३० स्पेशालिस्ट डॉक्टर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. तर ५ हजार रूग्ण तपासणीच ध्येय घेऊन कार्यरत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्पष्ट केले. आज उपजिल्हा रुग्णालयात याबाबतची नियोजन बैठक संपन्न झाली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील म्हणाले, पेडीयाट्रीक सर्जरी, ऑर्थोपेडीक, इएनटी, न्युरो,  कार्डीयोलॉजीसह इतर सर्व मोफत तपासणी होणार आहेत. पुढील उपचारही मोफत होणार असून के. एल. ई. पीआरओ व आमचे अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील उपचारासाठीची कार्यवाही केली जाणार आहे असे सांगितले. 

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, आम. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० जुलै रोजी मोफत महाआरोग्य शिबीर होत असून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या उपस्थितीत आज नियोजन झालं आहे. रूग्णांना चांगला लाभ मिळावा म्हणून याचे आयोजन केले असून १०० डॉक्टर यात चिकीत्सा करणार आहेत. जिल्ह्यातील रुग्णांनी देखील या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजू परब यांनी केले. यावेळी ‌जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, केएलईचे डॉ. अलम प्रभू,  जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वप्नील मालखेडे, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, आबा केसरकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, शरद धाऊसकर आदी उपस्थित होते.