
सावंतवाडी : राजकारणात पक्ष आणि विचार वेगळे असले तरी मैत्री घट्ट असू शकते, याचे उदाहरण सावंतवाडीत पाहायला मिळाले. नगरपरिषदेच्या राजकारणात एकमेकांसमोर असणारे माजी नगराध्यक्ष संजू परब व विद्यमान उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिवाळी निमित्त सावंतवाडीची संस्कृती जपत राजकीय पटलावरचा आदर्श कायम ठेवला आहे.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नुकतीच उपनगराध्यक्ष यांच्यावर उपरोधिक टीका केली होती. उपनगराध्यक्षांकडून यावर मात्र उत्तर दिलं नव्हतं. यातच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्या कार्यालयात जात त्यांनी लक्ष्मी कुबेराचे दर्शन घेतले. ॲड. निरवडेकर व कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.
यानिमित्ताने सावंतवाडीची परंपरा त्यांनी कायम जपली आहे. आपली २० वर्षांची मैत्री असून राजकारणापलिकडे आमचे ऋणानुबंध आहेत. याच भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा जपल्याचे श्री. परब यांनी सांगितले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. दोघांकडूनही सावंतवाडीची संस्कृती जोपासल्याचे चित्र पहायला मिळाले.याप्रसंगी हेमंत बांदेकर, सत्यवान बांदेकर, अमित पोकळे, कु. निरवडेकर, अमित पालव आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








