LIVE UPDATES

टेंबवली कालवी शाळेसमोरील सड्यावर आग

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 17:18 PM
views 22  views

देवगड : देवगड तालुक्यातील टेंबवली कालवी येथील शाळेसमोरील सड्यावर गुरुवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली असून ग्रामस्थांकडून घटना स्थळी धाव घेऊन ही आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी शेखर धुरी, प्रवीण शिंदे, प्रभाकर कोयंडे, हरिश्चंद्र मांडवकर, अनिल घाडी, प्रणाली कोयंडे, प्रिया मांडवकर, श्वेता घाडी, रश्मी राणे, सुनील घाडी आणि पूजा गणेश घाडी या ग्रामस्थांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

ही आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे आग वेळीच आटोक्यात आणून विझवण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शाळेच्या समोरच आग लागल्याने शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देखील ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.