LIVE UPDATES

‘आरंभ सखी’च्या गरबा उत्सवाचा वेदिका परब यांच्या हस्ते शुभारंभ

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 16:44 PM
views 46  views

सावंतवाडी : नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त ‘आरंभ सखी’तर्फे महिला व मुलींसाठी आयोजित नवरात्र गरबा कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या वेदिका विशाल परब यांच्या हस्ते झाला. सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेजमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महिला व मुलींना एकत्र येऊन नवरात्रोत्सवाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात गरबा आणि लाईव्ह म्युझिकची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत आयोजित या उत्सवातून महिलांना सांस्कृतिक सहभागाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी वेदिका परब यांनी उपस्थित महिला व मुलींशी संवाद साधून त्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. महिलांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाबद्दल त्यांनी ‘आरंभ सखी’च्या आयोजकांचे कौतुक केले.