LIVE UPDATES

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९९ रुपये आस्थापना खर्च

समिधा राणे यांच्या पाठपुराव्याला यश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 09, 2026 05:19 PM
views 44  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विनातिकीट प्रवास सवलत  सुविधा मिळावी  यासाठी समिधा सुधाकर राणे यांनी केलेल्या अर्जाला अखेर यश आले आहे.  बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आस्थापना खर्च म्हणून ९९ रुपयात कायमस्वरूपी बसप्रवासाची सुविधा मंजूर झाली आहे. याबाबत संबंधित विभागाकडे लेखी अर्ज सादर करण्यात आला होता .

या सुविधेमुळे निवृत्तीनंतरच्या काळात प्रवासासाठी होणारा आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करणारे सर्व राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचे समिधा  राणे यांनी आभार मानले आहेत.सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य पाठपुरावा आणि सर्वांच्या सहकार्यामुळे ही मागणी पूर्णत्वास गेल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.या मागणीसाठी विविध राजकीय नेतेमंडळींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश मिळून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी ९९ रुपयात कायमस्वरूपी बसप्रवासाची सुविधा मंजूर झाली आहे.