LIVE UPDATES

(NHM) संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली निलेश राणेंची सदिच्छा भेट

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 14, 2026 18:36 PM
views 57  views

मालवण : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय आणि समायोजन प्रक्रियेसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आभार व ऋण व्यक्त केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना-सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आभार व ऋण व्यक्त करण्यात आले आहेत. उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन सुरुवात केलेल्या समायोजनाच्या प्रकियेस आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नांनी तसेच आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून प्रयत्नातून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 15 ते 20 वर्षाच्या आरोग्य सेवेनंतर उज्ज्वल भविष्य मिळाले. हे ऋण कर्मचारी कधीही विसरणार नाहीत. असे सांगत कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व महायुती सरकारचे आभार मानले. 

यावेळी आमदार निलेश राणे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांना संपर्क करून उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद घडवून आणला. आरोग्य विभागात बरीच वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हिताचा निर्णय घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले.  

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना अध्यक्ष हेमदिप पाताडे, अजित सावंत, दिनार पडते, रश्मी सोहनी, सचिन परब, मनोज मालाडकर, डॉ.अनिरुद्ध मेहंदळे, भारती सावंत, रेश्मा पटेल, स्नेहा सावंत, स्वाती जळवी, क्रांती तोरसकर, सायली नाईक, शीतल खरात, रेश्मा मयेकर, गीतांजली पालव, ज्योती मराळ, सुविधा प्रभू, वेंगुर्लेकर, मूननकर, लीना अलमेडा यांसह अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.