
कणकवली : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्याचे महसूल खाते सांभाळले होते. महसूल विभागात नारायण राणे यांनी केलेले काम सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. या खात्यामध्ये राणेंनी पायंडा घातला व अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. याच निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम मी करत आहे. कारण राणेंनी घेतलेल्या निर्णयांचे दुरगामी परिणाम जाणवत आहेत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान शिबिरा निमित्त दौरे करण्यापूर्वी मी नारायण राणेंचा आशीर्वाद घेतला, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवलीतील कार्यक्रमात स्पष्ट केले.










