
सावंतवाडी : कै. प्रतिभा प्रमोद नाईक रेडकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला रेडकर कुटुंबियांनी रुग्णपयोगी वस्तू दिल्या. प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन रुग्णपयोगी वस्तू भेट स्वरूपात दिल्या.
चित्तरंजन नाईक रेडकर व देवेंद्र नाईक रेडकर यांनी त्यांची आई कै.प्रतिभा प्रमोद रेडकर नाईक यांच्या स्मरणार्थ फोल्डेबल बेड गादी तसेच, व्हीलचेअर, कमोड चेअर, वॉकर अशा रुग्णपयोगी वस्तू संस्थेला दान केल्या. संस्थेच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांनी ही भेट दिली. यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी नाईक रेडकर कुटुंबीयांचे आभार मानले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्य रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, रवी जाधव उपस्थित होते.










