
देवगड : जय बजरंग क्रिकेट क्लब, मळईच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शनिवारी सायंकाळी मळई हनुमान मंदिर येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जय बजरंग क्रिकेट क्लबच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी न.पं. बांधकाम सभापती रोहन खेडेकर, बाल मंडळ संगीत मेळा मळईचे अध्यक्ष संजय कोळंबकर, खजिनदार राजशेखर मुणगेकर, पाटील प्रदोष कोयंडे, उमेश भावळ, दीपक सारंग, सुदाम कोयंडे, मुरारी भावळ, सौ. मृणालिनी भावळ, सचिन मुणगेकर, रुपेश मुणगेकर, हर्षल मुणगेकर, मोरेश्वर मेस्त्री, नितीन कणेरकर, सागर मालंडकर, हर्षद वाडेकर, महेश पांमचाळ आदी मळई ग्रामस्थ तसेच गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.










